चालकाला फिट आल्याने बसला अपघात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूरहून नागपूरला जात असलेल्या राज्य परिवहन बसच्या चालकाला फीट येऊन नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली .या घटनेत तिघे जण किरकोळ जखमी झाले. 
 बस चालवत असताना अचानक चालकाला फीट आली आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या खाली उतरली. यात वाहकासह तिघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार करण्यात आले.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-22


Related Photos