सिनेमातील दृष्य पाहून अनुकरण करण्याच्या नादात घेतला गळफास ? ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू


वृत्तसंस्था /  औरंगाबाद :  सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात   गळफास घेतला आणि यात ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना  वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे  घडली आहे. विकास मछिद्र पवार असे मृत मुलाचे नाव असून ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता. यामुळे त्याने अनुकरण करण्याच्या नादात गळफास घेतला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 
प्राप्त माहितीनुसार सिडको महानगर १, वाळूज परिसर येथे राहणाऱ्या माजी सैनिक मच्छिंद्र पवार यांचा विकास हा एकुलता एक मुलगा होता, त्याला दोन बहिणी आहेत.  मच्छिंद्र पवार आणि त्यांची पत्नी  औद्योगिक वसाहतीत खाजगी नोकरी करतात. बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे ते कामावर गेले होते. तर विकासच्या दोन्ही बहिणी शाळेत गेल्या होत्या. विकास घरी एकटाच होता.  संध्याकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणी शाळेतून घरी आल्यावर विकासने  ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती  वडिलांना फोनवरून दिली. वडिलांनी तातडीने घरी येवून शेजारच्या मदतीने विकासला  दवाखान्यात दाखल केले . तेथील डॉक्टरांनी विकासला  तपासून  मृत  घोषित केले. 
११ वर्षीय विकासने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला. याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता.  मात्र हा अपघात आहे की आत्महत्या या दृष्टीकोनातून पोलिस   तपास करत आहेत.    Print


News - Rajy | Posted : 2018-11-22


Related Photos