चिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
स्थानिक शिवाजी चौकातील ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव सोसायटीच्या खातेदार आणि कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांनी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले असून येथील शाखा कार्यालय गेल्या आठ ते दहा दिवसापासुन बंद आहे. ठेविदार ठेवी परत मिळाव्या म्हणून  चकरा मारीत आहेत, मात्र बँक कुलूपबंद असल्याने त्यांना परत जावे लागत आहे. परंतु अद्यापही पोलिसांत तक्रार केली नसल्याने या प्रकरणात कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 
काही वर्षापूर्वी ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड लासलगांव (नाशिक) च्या वतीने चिमुर येथील शिवाजी चौकमधे शाखा सुरु करण्यात आली.  येथे नियुक्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून लाखो रूपये घेण्यात आले. बघता बघता या सोसाटीचे शेकडो खातेदार तयार झाले. ग्राहकाना ज्यादा व्याजाने पैसे परत मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. एजंटच्या माध्यमातून दरोरोज ही रक्कम जमा करण्यात येत होती, मात्र काही दिवसानंतर अचानक या शाखेल ताले लावण्यात आले.  त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . मात्र याबाबत अद्यापही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही.    Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-22


Related Photos