महत्वाच्या बातम्या

 साकोली येथे करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे औद्योगीक प्रशिक्षण संस्था साकोली येथे नुकताच करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उप प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली के.बी. लाडे, उद्घाटक नॅशनल ट्रेनर जितेंद्र मेश्राम यांनी युवकांना रोजगार विषयी मार्गदर्शन केले व शिक्षणासोबतच कौशल्य असणे गरजेचे आहे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. विशेष अतिथी डी.आय.सी व्यवस्थापक बी. के. खरमाटे यांनी उद्योग व विविध योजनेची माहिती यावेळी सांगितले.

तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी शामराव बापू कापगते कला वाणिज्य महाविद्यालय साकोली प्राध्या. डॉ. विजय दरवडे, नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम प्रमूख सहाय्यक अहिरकर, सूर्यकांत मरघडे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथील रामटेके, सोलंकी, कुरसुंगे, वैद्य, करोडे, कंगाले व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्र च्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक कोयल मेश्राम यांनी केले तर आभार आठवले यांनी मानले.





  Print






News - Bhandara




Related Photos