महत्वाच्या बातम्या

 वाढती महागाई विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जनजागरण यात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देशातील वाढती महागाई, अत्याचार, बेरोजगारी इत्यादी विषयांवर जनजागर-यात्राच्या माध्यमातून  सरकारच्या विरोधात जनतेत जनजागरण करण्याच्या उद्देशाने येथील नगरपरिषद चौकात सभा घेण्यात आली. 

या सभेला राष्ट्रवादी महिला ३ काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वर्षा निकम अमरावती, शहीन हकीम, डॉ. सूरेखा देशमुख जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महीला जिल्हाध्यक्षा बेबी उईके, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा पाटील, बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे, महीला विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे, बल्लारपूर शहर महीला अध्यक्ष मल्लेश्र्वरी महेशकर, तालुका अध्यक्ष जिवनकला आलाम, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, जिल्हा सरचिटणीस बब्बुभाई ईसा, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया नितीन पिंपळशेंडे, माया सातपुते, कुणाल ठेंगरे, निखिल दुर्योधन, सरस्वती गावंडे, अमर धोंगडे, आरीफभाई खान, अमर रहीकवार, अजित पाडवेकर तसेच मोठ्या संख्येने महीला व बल्लारपूर वासिय नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी हिराचंद बोरकुटे, राजेंद्र वैद्य, राकेश सोमाणी, शुभांगी साठे, डॉ. सुरेखा देशमुख व बेबी उईके यांनी सभेला मार्गदर्शन केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos