महत्वाच्या बातम्या

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे भरती मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे २२फेब्रुवारी २०२३ ला सकाळी १०.०० वाजता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. व त्याच तारखेला मुलाकात घेणार आहेत. करिता वर्ष २०१८, २०१९, २०२०, २०२१ व २०२२ मध्ये फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल आणि  एएमपी डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक आणि पेंटर जनरल या व्यवसायातून आय. टी.आय. उत्तीर्ण झालेले उमेदवार या करीता पात्र आहेत. मागील दोन वर्षापासून सुझुकी मोटर या जिल्हयात भरती आयोजित करत आले, असून २५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत.

सदर भरती मेळाव्याला जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता ९५९५७४०९१२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos