कालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा :
तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील गोदावरी नदीत अंघोळीकरिता गेलेल्या मित्रांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. अनिल कुळमेथे , महेन्द्र पोरेटे, रोहित कडते तिघेही रा. चिंतलधाबा, ता. पोंभुर्णा असे मृतक युवकांचे नाव आहेत . मृतकामधे एक पोलीस शिपाई असल्याचा बोलल्या जात आहे . 
प्राप्त माहितीनुसार , चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा गावातील असलेलं मृतक युवक मित्रांसोबत कालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आले होते. नजीकच्या गोदावरी नदीत अंगोळीसाठी गेले असता हि दुर्घटना घडली. अद्याप मृतकांचे मृतदेह मिळाले नसून पोलीस प्रशासनाकडून शोधमोहीम सुरु आहे. या घटनेने मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-21


Related Photos