महत्वाच्या बातम्या

 तोडसा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन


- उपसरपंच प्रशांत आत्राम ग्रामपंचायत तोडसा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न 
              
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / एटापल्ली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत भगवंतराव कला विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आरोग्य मतदार जनजागृती व ग्राम विकासाकरिता युवाशक्ती या विषयावर विशेष श्रम संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले.    

सदर शिबीराचे उद्घाटन प्रशांत आत्राम उपसरपंच तोडसा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुरेश सावकार बिरमवार, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य एस. एन. बुटे होते. यावेळी मैंद, पुंगाटी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोडसा, रैजु गावडे सदस्य ग्राम पंचायत तोडसा, व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos