जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णास जीवनदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अमोल चुक्कु पुंगाटी वय ४ वर्षे मु. बोडंगे ता. भामरागड येथील रहीवासी असून या रुग्णाला ताप आले असता त्यांनी प्रथमोपचार शासकीय दवाखान्यात न करता पुजारी यांच्याकडे गेले. त्यात त्यांच्या कालावधीत २ ते ३ दिवस पुजारीकडे दाखवण्यात आले. त्यामुळे रुग्ण अर्धभूल परिस्थितीत ( गंभीर ) आजारी झाला असता  रुग्णाला ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. रुग्णास सुधारणा होत नसल्यामुळे डॉ. भावेश वानखेडे , वैद्यकीय अधिक्षक यांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय , अहेरी येथे रेफर करण्यात आले. तात्काळ जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली यांनी अहेरी येथे भेट देवुन रुग्णाची स्थिती बघून अहेरी येथे डॉ. पेंदोर , वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णाला औषधोपचार व रक्त देवून रुग्णाला जीवनदान दिले. 
जनतेला आवाहन करण्यात येत आहे, की ताप कोणताही असो, प्रथम शासकीय रुग्णालयात दाखवावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक व आरोग्य विस्तार अधिकारी , अहेरी  अशोक एडलावार यांनी केले आहे. त्यामुळे तापाचे रुग्ण मृत्यूचे प्रमाण कमी होईल . याची जनतेने काळजी घ्यावी.
 जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. कुणाल मोडक यांनी गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भाग  भामरागड, अहेरी, सिरोंचा, धानोरा, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, या भागात मलेरीया , डेग्यू, चंडीपुरा या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरीकांनी आरोग्याच्या उपचारासाठी महागाडया शहरात किंवा लांबच्या दवाखान्यात जाणे आर्थिकरीत्या परवडत नाही. त्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन व चालीरीती , उपचार व अंधश्रध्देवर विश्वास लक्षात घेऊन जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, गडचिरोली अतिदुर्गम भागातील नागरीकांनी ताप कसलाही असो प्रथम आशा, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, उपकेंद्र, प्रा.आ.केंद्र यांचा लाभ आरोग्य तपासणी व रक्त तपासणीसाठी करावा , असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-20


Related Photos