राज्यातील ७३८ अस्थायी डाॅक्टर स्थायी कधी होणार?


- मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतरही अंमलबजावणी नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा
: राज्यातील आदिवासी पाडे, तांडे, ग्रामीण वस्त्यांपासून तर नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम डोंगराळ भागात रूग्णसेवा देणाऱ्या ७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय राज्य शासनाने २९ आॅगस्ट २०१७ रोजी घेतला होता. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे निर्णयाला केराची टोपली दाखविली तर जात नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर बर्याच पायाभूत सुविधांची कमी आहे. अशाही स्थितीत गेल्या १५ ते २० वर्षांपासून आयुर्वेदासह इतर पॅथीचे ७३८ अधिकारी अस्थायी स्वरूपात रूग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत. अल्प वेतनात सेवा देत असल्याने डाॅक्टरांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.
राज्यभरातील हजारांवर रोजंदारी कामगारांना शासन स्थायी करते. परंतु गडचिरोलीपासून मेळघाटात देवदूताची भूमीका पार पाडत असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यात मात्र शासनाने अंधार करून ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९  आॅगस्ट २०१७ मध्ये मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला. परंतु १५ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे या वैद्यकीय अधिकार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याच्या विविध भागात अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या यापैकी सुमारे १२ हून अधिक डाॅक्टरांचा अपघत, ह्रदयरोग तसेच कर्करोगासह इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यामधील ३३४ जण विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सेवा देत आहेत, हे विशेष.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-20


Related Photos