कोईलारी ग्रामपंचायत व जि. प. शाळेतील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी :
तालुक्यातील कोईलारी ग्रामपंचायत व जि. प . शाळेतीच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साहित्य व अन्नधान्य लंपास केले . सदर घटना १६  नोव्हेंबरला रात्री घडली. याबाबत ग्रामसेवक व मुख्याध्यापकांनी देवरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत मध्ये असलेले  विद्युत मीटर, दोन बॅग ब्लिचिंग पावडर आणि आणखी दुसरे साहित्य उडविले तसेच ग्रामपंचायतला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळेमधील शाळेच्या दाराचे कुलूप तोडून दोन पोती तांदळाची चोरून  नेले . याबाबत ग्रामसेवक खोटेले व शाळेचे मुख्याध्यापक बोरकर यांनी देवरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अवरासे करीत आहेत.  Print


News - Gondia | Posted : 2018-11-20


Related Photos