महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


महत्वाच्या घटना 

14 जानेवारी 1761 : मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

14 जानेवारी 1923 : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

14 जानेवारी 1948 : लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

14 जानेवारी 1994 : मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

14 जानेवारी 1998 : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.

14 जानेवारी 2000 : ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना 1999 चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म

14 जानेवारी 1882 : संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर1953 )

14 जानेवारी 1883 : जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू : 30 नोव्हेंबर 1970 )

14 जानेवारी 1892 : भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑगस्ट 1993 )

14 जानेवारी 1896 : भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑक्टोबर 1982 )

14 जानेवारी 1905 : मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू : 22 सप्टेंबर 1991)

14 जानेवारी 1908 : ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.

14 जानेवारी 1919 : गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू : 10 मे 2002 )

14 जानेवारी 1923 : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2009 )

14 जानेवारी 1926 : ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.

14 जानेवारी 1931 : ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 2008 )

14 जानेवारी 1977 : भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.

मृत्यू 

14 जानेवारी 1742 : धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1656 )

14 जानेवारी 1761 : पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म : 4 ऑगस्ट 1730 )

14 जानेवारी 1761 : पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म : 2 मार्च 1742 )

14 जानेवारी 1898 : इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.

14 जानेवारी 1920 : डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1864 )

14 जानेवारी 1991 : संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1917 )

14 जानेवारी 2001 : माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos