महत्वाच्या बातम्या

 आ. विनोद अग्रवाल यांचे गावपातळीवर असलेले शासकीय यंत्रणेला तातडीचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : मागील ३ दिवसापासून सातत्याने गोंदिया तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतपीकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीव संतापले आहे व एकीकडे काही दिवसापूर्वीच सातत्याने येत असलेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. व त्यांना नुकसानीची भरपाई करीता त्वरित पंचनामे करण्यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी शासकीय यंत्रणेला तातडीचे निर्देश दिले आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे चौकशी करीता आ.विनोद अग्रवाल यांनी प्रत्यक्ष ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी यांना शासकीय यंत्रणेसह भेट दिली होती व त्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये नुकसानीची रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत.

आ.विनोद अग्रवाल हे नेहमीच शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये तत्पर राहून त्यांना न्याय देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहत असतात. तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांनी शासकीय यंत्रणेला संपर्क करून त्वरित पंचनामे करून घ्यावे असेही बोलले आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी आमदारकीचे सूत्र स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण त्यांनी केले आहे. त्यात ७/१२ ऑनलाइन, शेतपांदन रस्ता, कृषी गोदाम व अश्या बरेच कामे आ.विनोद अग्रवाल यांनी केले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos