महत्वाच्या बातम्या

 उज्वला योजनेचे गॅस कनेक्शन न देणाऱ्या फौजदारी एजन्सीवर गुन्हा दाखल करा : विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सरकारमार्फत उज्वला योजना हि जैविक इंधनामुळे होणारे आरोग्यसंबंधित गंभीर आजार, मृत्यूदर कमी व धुरमुक्त करण्याकरिता राबविण्यात आली आहे.

परंतु गडचिरोली येथे सर्व गॅस एजन्सी मध्ये अजूनही अनेक गोरगरीब रेशन कार्ड धारकांचे ऑनलाईन अर्ज भरून आहेत. परंतु त्या नागरीकांना या योजनेमार्फत गॅस कनेक्शन देण्यात आले नाही. अशा सर्व गॅस एजन्सीचा येणाऱ्या महिन्यात सखोल चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा गडचिरोली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी आव्हान केले आहे. 

त्यांच्यासोबत मुझाहिद पठाण, शकीला पठाण, रुपाली वलके, खतीजा शेख, मयूर जुवारे, विनोद सहारे, हेमराज लांजेवार, विवेक कांबळे, सूरज मडावी, प्रदीप चिंचोलकर, अक्षय मेश्राम, अजय मेश्राम, राकेश पिपरे, चंद्रशेखर मेटे, बाबूलाल रामटेके, ओमप्रकाश मेटे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos