अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी : चिमूर तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्यातील शंकरपूर नजीकच्या खापरी येथील एका इसमावर अस्वलाने हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. धनराज बापूंना शेंडे (५२) असे जखमी इसमाचे नाव आहे . 
शेंडे खापरी ते नवतला पांदण रस्त्याने शेतावर जातांना आपल्या पिल्लांसोबत जात असलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अशातच त्यांच्या डोक्यावरची टोपी अस्वलाच्या दातात अडकली गेली. या हल्ल्यातून कशीबशी सुटका करून घेत धनराज यांनी गंभीर अवस्थेत गावाकडे धाव घेतली.  त्यांना जखमी अवस्थेत चिमूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले . घटनास्थळावर वनकर्मचारी केदार व नवघडे, पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य आमोद गौरकर जाऊन पंचनामा केला.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-19


Related Photos