ठग्ज ऑफ महाराष्ट्र पोस्टर फडकवून सरकारचा विरोधी पक्षाकडून निषेध


-वा रे फडणवीस तेरा खेल...सस्ती दारु महंगा तेल 
-विरोधकांची विधानभवन पायऱ्यावर बसून जोरदार घोषणाबाजी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
ठग्ज ऑफ महाराष्ट्र पोस्टर फडकवून सरकारचा विरोधी पक्षाकडून निषेध नुकताच रिलीज झालेल्या ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटाचा आधार घेत जोरदार घोषणाबाजी पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्ष मधील आमदारांनी व  समविचारी पक्षाच्या आमदारांनी  विधानभवन परिसर दणाणून सोडला.
वा रे फडणवीस तेरा खेल... सस्ती दारु महंगा तेल...  फडणवीस सरकार होशमें आओ... घरपोच दारु देणाऱ्या सरकारचा निषेध असो... मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पहिल्याचदिवशी पटलावर ठेवा... अशा घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी विरोधीपक्ष आमदारांनी आणि समविचारी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत सरकारला कसे ‘सळो की पळो’ करुन सोडणार याची चुणूक दाखवून दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सरकारला जनतेच्या प्रश्नावर कोंडीत पकडण्याची रणनिती आखली असून त्यानुसार पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्ष आमदारांनी आणि समविचारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. यावेळी घोषणाबाजी करतानाच ठग्ज ऑफ महाराष्ट्र असे पोस्टर फडकवून सरकारचा निषेधही नोंदवला गेला. 
दरम्यान काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानसभेतील मुख्यप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील मुख्यप्रतोद आमदार हेमंत टकले आणि आदींसह विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातील आमदार सहभागी झाले होते.

 



  Print






News - Rajy | Posted : 2018-11-19






Related Photos