पोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
शहरातील दुर्गादेवी बघून पायदळ घरी जात असतांना अज्ञात दोन २० ते २२ वयोगटातील इसमांनी टुव्हीलरने येऊन रात्रीला अंधाराचा व रस्त्यावरील लोकांची वर्दळ नसल्याचा फायदा घेऊन महिलेच्या हातात असलेला सॅमसंग जे ७ मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला व पळून गेले. याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त होताच गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे . अनिकेत बबनराव मुन, (१९)  रा. झाडगाव याला अटक करण्यात आली आहे . 
१४ ऑक्टोबर रोजी चे रात्री १०.५० ते ११ वा. दरम्यान यातील फिर्यादी दीपाली विलासराव ठाकरे वय २२ वर्ष रा. नागरमोते यांचे घरी, साई नगर, वर्धा हि तिच्या मैत्रिणींसह वर्धा शहरातील दुर्गादेवी बघून पायदळ घरी जात असतांना जगजीवन शाळेसमोर सार्वजनिक रोडवर अज्ञात दोन २० ते २२ वयोगटातील इसमांनी टुव्हीलरने यांचे पाठीमागून येऊन रात्रीला अंधाराचा व रस्त्यावरील लोकांची वर्दळ नसल्याचा फायदा घेऊन फिर्यादीचे हातात असलेला सॅमसंग जे ७ मोबाईल काळ्या रंगाचा १० हजार ९०० रु. चा बळजबरीने हिसकावून घेतला व पळून गेले फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र. ७७७/२०१८ कलम ३९२,३४ भादवीचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. 
गुन्ह्याची  गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याचा दाखल ताराखेपासूनच पाठपुरावा केला व गुन्ह्यातील आरोपी शोधाकरिता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे समांतर तपस करण्यात येत असून सराईत गुन्हेगार चेक करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार लावण्यात आले होते. यातच १७ नोव्हेंबर रोजी स्था.गु. शा. चे पथकाला सदर गुन्ह्यातील आरोपी संबंधाने मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर बातमीवरून संशयित इसम अनिकेत मुन, रा. झाडगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा  साथीदारांसह केल्याचे गुन्ह्यातील कबुल केले. गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेले वाहनाबाबत माहिती दिली. वरून गुन्ह्यात अनिकेत बबनराव मुन, वय १९ वर्ष रा. झाडगाव, १ विधिसंघर्षित बालक यांस अटक करण्यात आली असून त्यांचेकडून सॅमसंग जे ७ मोबाईल १० हजार ९०० रु. व हिरोहोंडा पॅशन क्रमांक एमेच ३२ ए.सी. ४७१५ कि. ५० हजार रु. असा ६० हजार ९०० रु. चा माल जप्त करण्यात आला. 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज  तेली व प्रभारी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निदर्शप्रमाणे पो.उप नि.  महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, निरंजन वरभे, तुषार भुते, राकेश आष्टणकर, आत्माराम, मुकेश, तसेच सायबर सेलचे दिनेश बोथकर, टांकसाळे, कत्तोजवार, वाघमारे, कावळे, राऊत यांनी केली. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-11-18


Related Photos