आष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी :
चामोर्शी तालुक्यातील आष्टी महामार्गावर आज अवजड वाहनाचा समोरचा टायर फुटल्याने वाहन भर रस्त्यावर उलटला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . नितेश बाबुराव मेडिवार रा. उमरी, ता. चामोर्शी असे जखमीचे नाव आहे . 
आष्टी महामार्गाने अहेरीकडे बारीक चुरी घेऊन जात असलेल्या अवजड वाहनाचा टायर फुटला आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या मधोमध उलटला. घटनेच्यावेळी अपघातग्रस्त वाहनाच्या जवळ कोणतेही प्रवाशी वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र चालक गंभीर जखमी असून त्याला अहेरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन महामार्गाच्या मधोमध उलटला असल्याने येजा करणाऱ्या इतर वाहनांना अडचण निर्माण होत आहे .   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-18


Related Photos