महत्वाच्या बातम्या

 कुनघाडा रै. येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था कुनघाडा रै. यांच्या वतीने कुनघाडा येथील किसान भवनात मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अलका धोडरे, ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बिधान देवरी, डॉ राखडे, डॉ अतुल सुरजागडे, डॉ. राय ग्रा. प. सदस्य दिलीप दुधे, ग्रा. प. सदस्या सुनंदा उडाण, ग्रा. प सदस्य वैभव दुधबळे, प्रियंका नैताम, देवणीता लॅबचे अरुण गव्हारे आदी उपस्थित होते.  

शिबिरात महिला व पुरुष यांची बी.पी तपासणी व इतर आजारावर औषधोपचार करण्यात आले. 

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंगेश वासेकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी काजल वासेकर, पियुष गव्हारे, अंकुश कुनघाडकर, अक्षय सुरजागडे, रमेश कोठारे, केशव कोठारे, मुरलीधर उडाण यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos