जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील जैनापुरा परिसरात ही चकमक झाली. परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे शोधमोहीम राबवण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याचा प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. 



  Print






News - World | Posted : 2018-11-18






Related Photos