महत्वाच्या बातम्या

 मिनि विधानसभेच्या निवडणुकांचे लागले वेध


- निवडणुका लांबल्याने विकासकामे झाले ठप्प

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / खाबांडा : ग्रामपंचायत निवडणुकांचा ढोल शांत झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार महिना भरात उडेल, असेच वाटत होते. परंतु, या निवडणुकांच्या बाबतीत अद्यापही सर्व काही शांत आणि आलबेल असल्याचेच दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार तरी कधी असा सवाल आता सर्वसामान्य जनतेला पडत आहेत त्यातच या निवडणुकांकडे इच्छुकांचे देखील डोळे लागले आहेत अनेक इच्छुकांनी गेल्या अनेक महिण्यापासुन आपल्यालाच उमेदवारी मिळेल या हेतुने सर्व प्रकारची जय्यत तयारी करून ठेवली आहे. लग्न संमारंभ, वाढदिवस अश्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाना निमत्रण भेटताच अगदि वेळेवर हजेरी लावणे शेतकर्याच्या समस्या घेवून आंदोलन करणे, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबिर अश्या कार्यक्रमातुन आपला संपर्क वाढवत आहेत. पंरतु सरकारच्या माध्यमातुन या निवडणुका संदर्भात काहिच निर्णय होत नसल्याने इच्छुकांच्या नजरा आता निवडणुका केव्हा जाहिर होणार याकडे लागले आहेत.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी ठाकरे सरकार जाऊन शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्या बरोबर जिल्ह परिषदेच्या गट आणि गणांच्या संख्येचा निर्णय बदलण्यात आला मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद गटांची रचना पुर्विप्रमाणे म्हणजे सन २०१७ मधील निवडणुकांप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला शासन स्तरावरील गुंतागुंतीमुले मुदत संपुनहि या निवडणुका वरचेवर लांबत आहेत , ग्रामिण भागातील गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु म्हणुन जिल्हा परिषद व पंचायत समीती यांचेकडे पाहिले जाते मात्र सरकरच्या वेळकाढू धोरणामुळे निवडणुक लांबणीवर पडल्याने आता याच फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. यामुळे अनेक विकासका ठप्प झालेली आहेत, तर अनेक इच्छुकांना राजकीय निर्णय घेणे अवघड बनले आहे. या निवडणुका केव्हा लागतील याविषयी अजून तरी सर्वत्र शांतताच दिसत आहे , त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काल निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos