वॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली व्दारा राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशास अनुसरुन आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी चौकातून सकाळी ८ वाजता रस्ता सुरक्षा जनजागृतीकरीता दोन किलोमीटर वॉकेथॉन रॅलीचे आयोजन केले करण्यात अाले. या  रॅलीत जिल्हयातील सर्व शासकीय  विभागातील अधिकारी/ कर्मचारी , निमसरकारी संस्थेतील कर्मचारी व शाळा / महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यानी  मोठया संख्येने सहभाग घेतला.  

याप्रसंगी रॅलीत  फलकाव्दारे तसेच  रॅली मार्गस्थ होत असतानाच  नागरिकांना रस्तासुरक्षा संदर्भातील माहितीचे पत्रके व पुस्तकांचे वितरण करण्यात आले.  तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे रस्ता सुरक्षा बाबत घोषणा देण्यात आल्या.

रॅलीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम व  विद्यार्थी, कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थिती होते.

 यावेळी प्रामुख्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  रविंद्र भुयार,  मोटर वाहन निरीक्षक  शफीक उचगावकर, सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक विलास  अहेर , विजय राठोड, हर्षल बदखल, सार्वजनिक बांधविभागाचे  अधिक्षक अभियंता राजू गायकवाड व कार्यकारी अभियंता प्रकाश बुब ,  पोलिस उप निरीक्षक श्रीमती तांबुसकर तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.     

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-18


Related Photos