वाघाने महिलेला गावातून नेले फरफटत


- ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपुरी :
तालुक्यातील पवनपार येथे वाघाने महिलेला गावातून फरफटत जंगलाच्या दिशेने नेऊन तिला ठार केल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली . जिजाबाई मोरेश्वर डोंगरवार असे मृत महिलेचे नाव आहे . या घटनेने परिसरात कमालीची दहशत पसरली आहे . 
आज सकाळच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ वाघाने एका महिलेवर हल्ला चढवून तिला खेचत जंगलाच्या दिशेने नेले, घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत .  
या भागात वाघाने अनेकदा दर्शन दिल्याने शेतकऱ्यांना व शेतमजुरांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. वन विभागाने या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-18


Related Photos