महत्वाच्या बातम्या

 पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांमध्ये मोट्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासंदर्भात पुर्ण राज्यभर  शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत आहेत. पत्रकार बांधवांच्या संतप्त भावना आपण लक्षात घ्याव्यात. पुरोगामी राज्यात पत्रकारांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रात निर्भीडपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधत शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध केले. शासनाने गांभिर्याने दखल घेण्याची विनंती निवेदनाद्वारे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री ला प्रेषित केले. निवेदन देतांना महाराष्ट्र पत्रकार संघ चे जिल्हा अध्यक्ष मुन्ना खेडकर, राज्य कार्यकारणी सदस्य पद्माकर पांढरे, तालुका कोषाध्यक्ष देवेंद्र झाडे, रमेश निषाद, तालुका अध्यक्ष अजय रासेकर, उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos