महत्वाच्या बातम्या

 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वली हैदर बाबा उर्स उत्साहाचे घेतले दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी प्रमाणे हा वर्षी सुधा हजरत वली हैदर शाह बाबा उर्स व कव्वाली कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन वली हैदर शाह बाबाचे कार्यकर्त्या समवेत दर्शन घेतले. माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून कार्यक्रमाला ३१ हजार रुपये रोख रकमेची मदत करण्यात आली. यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे, असे वली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केले.

यावेळी, सिरोंचा नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक इम्तियाज खान, ग्राम संवाद सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य अहेरी नि. क्षेत्र अध्यक्ष किरण वेमूला, रवी बोगोणी, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी जि.प. अध्यक्ष यांच्या सोशल मीडियाचे समन्वयक संपत गोगूला, नरेश गर्गम, राकेश सडमेक सह आविसंचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos