महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१० फेब्रुवारी)

१० फेब्रुवारी १९२३ : टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.

१० फेब्रुवारी १९२९ : जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

१० फेब्रुवारी १९३१ : भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

१० फेब्रुवारी १९३३ : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.

१० फेब्रुवारी १९४८ : पुणे विद्यापीठाची स्थापना.

१० फेब्रुवारी १९४९ : गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.

१० फेब्रुवारी १९९६ : आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.

१० फेब्रुवारी २००५ : उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

जन्म (१० फेब्रुवारी)

१० फेब्रुवारी १८०३ : दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८६५)

१० फेब्रुवारी १८९४ : इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)

१० फेब्रुवारी १९१० : साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००२)

१० फेब्रुवारी १९४५ : केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून २०००)

मृत्यू (१० फेब्रुवारी)

१० फेब्रुवारी १८६५ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिक लेन्झ यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४)

१० फेब्रुवारी १९२२ : निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)

१० फेब्रुवारी १९२३ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८४५)

१० फेब्रुवारी १९८२ : विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९३२)

१० फेब्रुवारी २००१ : जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०४)

१० फेब्रुवारी २०१२ : एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)





  Print






News - todayspecialdays




Related Photos