अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती द्या : महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेची मागणी


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना २०१४ /१५ ते २०१७/१८ पर्यंत अशा चार वर्षाची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरित वाटप करा, अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नत्थूजी गोडशेलवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, सचिव विजय बोलीवार यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे .  
निवेदनावर चर्चा करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी  यांनी शिष्यवृत्ती वाटप करीत केंद्र शासन ५० टक्के व राज्य शासन ५० टक्के निधी देतो त्यानुसार राज्यशासनाच्या ३५ लाख निधी जी.प. ला प्राप्त झालेला आहे. परंतु केंद्र शासनाने चार वर्षांपासून निधी न दिलेल्यामुळे आम्ही शिष्यवृत्ती वाटप करू शकत नाही असे निदर्शनास आणून दिले. 
त्यामुळे संघटनेने येत्या या पंधरा दिवसात शिष्यवृत्ती वाटप न केल्यास पालक व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जी.प. समोर आंदोलन करण्यात येईल असा निवेदनातून इशारा दिला. यावेळी प्रामुख्याने एमसेफ चे प्रदेशाध्यक्ष प्रा. एच.बी. नक्कलवार, संघटनेचे प्रदेश महासचिव भजनदास आलेवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, शेकर सित्तलवार, दूष्यात लाटेलवार, राकेश मंथनवार, जिल्हासदस्य उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-17


Related Photos