वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी :
पुतळी येथील वृद्ध महिलेला शिवीगाळ करीत जबर मारहाण करणाऱ्या विरोधात देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . देवचंद कुसराम (३५) असे आरोपीचे नाव आहे . 
सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील वृद्ध महिला शांताबाई हेमराज मेश्राम (६० ) १६ नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजता दरम्यान आपल्या घरासमोर बसली असता घराच्या बाजूला राहत असलेला देवचंद कुसराम याने महिलेला  शिवीगाळ करत जबर मारहाण केली. याबात फिर्यादीच्या तक्रारीवरून देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास जमादार औरसे करीत आहेत .  Print


News - Gondia | Posted : 2018-11-17


Related Photos