२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर : 
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संविधान दिनाचे औचीत्य साधुन दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर २६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता ओबीसी समाजाच्या सवैधानीक न्याय मागण्यांसाठी धरणे  आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 ओबीसी समाजाची जनगनना घोषीत करावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.ओबीसीना लावण्यात आलेली क्रिमिलेअरची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. शेतकऱ्यांना वनहक्क पटयासाठी लागणारी तिन पिढयाची अट रद्द करण्यात यावी. शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर केंद्रात व राज्यात योजना सुरु करण्यात यावी.ओबीसी संवर्ग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे. ओबीसी समाजासाठी लोकसभा व विधानसभा स्वतंत्र निर्वाचन क्षेत्र निर्माण करण्यात यावे. महात्मा फुले,सावीत्री फुले, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
 चिमूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवानी दिल्ली येथील धरणे आंदोलनाला हजारोच्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन चिमूर तालुका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अरूण लोहकरे, सचिव किर्ती रोकडे, कोषाध्यक्ष राजेंद्र लोनारे, किशोर भोयर, संजय दुधनकर, विजु पाटील, रमेश करारे, रोहीत उरकुडे, प्रमोद शास्त्रकार, अजित सुकारे, गुरुदास कोसरे यांनी केले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-17


Related Photos