महत्वाच्या बातम्या

 भंडारा येथील रवींद्रनाथ टागोर युवा मंचतर्फे रक्तदान शिबिर संपन्न


- सामाजिक जाणीवेतून मित्राच्या स्मृतीत करतात रक्तदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सर्व दानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. प्रिय माणूस हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणीत शोक करीत बसण्यापेक्षा त्या स्मृती सतत कायम राहाव्यात, या उदात्त हेतूने एकत्र आलेल्या युवकांच्या धडपडीने २००२ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन रवींद्रनाथ टागोर युवा मंच बहुद्देशीय सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्यावतीने केले जात आहे. सतत २२ वर्षांपासून शेकडो रक्तदाते या शिबिरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करतात. या युवकांनी सामाजिक जाणीवेतून आपल्या लाडक्या मित्राच्या स्मृतीत रक्तदान करून परंपरा जोपासत आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता मुरारी काबरा यांनी केले.

भंडारा येथील रवींद्रनाथ टागोर युवा मंचच्या वतीने येथील रवींद्रनाथ टागोर चौक स्व.अण्णाजी खंडाळकर निवासी अभ्यासिका सभागृहामध्ये प्रकाश सव्वालाखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. २००१ मध्ये प्रकाश सव्वालाखे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आपल्या मित्राची एक आठवण म्हणून रवींद्रनाथ टागोर युवा मंच बहुउद्देशीय सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक संस्थातर्फे बुधवार, ८ फेब्रुवारीला  रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भंडारा अर्बन बँकेचे संचालक डॉ. जगदीश निंबार्ते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता मुरारी काबरा होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरेंद्र व्यवहारे, माजी नगरसेविका मधुरा मदनकर, जॅकी रावलानी, मंगेश वंजारी, सामान्य रुग्णालय भंडाराचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सचिन कारंजेकर उपस्थित होते. दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जात असून वर्षभरात गरजू, थॅलेसिमिया तसेच विविध आजारातील रुग्णांना या संस्थेतर्फे रक्तपुरवठा केला जातो. सामान्य रुग्णालयातील समाजसेवा अधिपरिचारक डॉ. विनय ढगे, डॉ. लोकेश गोटेफोडे, दामिनी गिऱ्हेपुंजे, साक्षी बांगरे, प्रतिम वासेकर, पवन ढेंगे, राहुल गिरी यांनी सहकार्य केले. संचालन व आभार प्रदर्शन राजू मस्के यांनी केले.

७५ जणांचे रक्तदान

मनोज संघानी, शिरीष धनकर, राजेंद्र दाेनाडकर, माजी नगरसेवक बंटी मिश्रा, नितीन साकुरे, भुषण चुनोडे, लोकेश मुटकुरे, सौरभ मुटकुरे, स्वप्नील येवले, प्रशांत डोमळे, सारंग बेदरकर, भूषण मुटकुरे, हितेश ठाकरे, संजय चौधरी, राजू मस्के, संजय सव्वालाखे, सतपाल माहुले, पूनम तिवारी, श्रीकांत आंबाडारे, नीलेश सव्वालाखे, आशिष सूर्यवंशी, श्रीकांत सार्वे, प्रतिम फाये, मनीष मस्के, सोनू शेंडे, नरेंद्र मुटकुरे, संजय मेश्राम, विक्की मिश्रा, गिरीधर बंधाटे, अजय भोंगाडे, शेषराव कुंभारे, अनुप ढोके, संदीप सार्वे, कार्तिक येरपुडे, जितू हलमारे, डॉ.भांगे, सोनू मन्होत्रा तसेच प्रथम रक्तदात्यामध्ये वेदांत फाये, प्रविण राऊत, अक्षय लाडे, रुपेश निनावे, कैलास पटले, योगेश लिमजे, मृदुल खुरपुडे, अंकित चवळे, चैताली गराडे, मोहीनी नाकाडे व छात्रवासचे विद्यार्थी आदींचा समावेश होता. 






  Print






News - Bhandara




Related Photos