महत्वाच्या बातम्या

 माओवादी कनेक्शन प्रकरणी जी. एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता निर्णयाला स्थगिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : माओवादी कनेक्शन प्रकरणी जी. एन. साईबाबा यांच्यासह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टाने अखेर नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे.

माओवादी चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती.

यानंतर काही तासात महाराष्ट्र सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली आहे.

मला या गोष्टीचे समाधान आहे, की सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबांबाबत दिलेला निर्णय सस्पेंड केला. मी काल देखील बोललो होतो. की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक होता. कारण ज्या व्यक्तीविरोधात माओवाद्यांना मदत केल्याचे येवढे पुरावे आहे, त्याला तांत्रिक मुद्द्यावर सोडणे हे चुकीचे होते. म्हणून कालच्या काल आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार आहे, की त्यांनी तात्काळ बेंच गठीत केला आणि नागपूर खंडपीठाने प्रो. साईबाबा बाबत दिलेला निर्णय सस्पेंड केला. पुढची कायदेशीर लढाई आम्ही लढू, पण आज तरी माओवाद्यांशी लढताना शहीद झाले त्यांच्या परिवाराला दिलासा देणारे निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

जे पोलीस शहीद झाले, त्यांच्या परिवारासाठी कालचा निर्णय दुःखद होता. कारण जे लोक त्या पोलिसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत होती, असे लोक तांत्रिक कारणाने सुटणे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांनाही दिलासा मिळाला. हायकोर्टात आपण कुठेच कमी पडलो नाही. पण तांत्रिक कारणाने सोडले होते, असेही फडणवीस म्हणाले.





  Print






News - Nagpur




Related Photos