महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना खेडकर यांची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी बल्लारपूर येथील पत्रकार मुन्ना उर्फ संतोष खेडकर यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन २०२३ साठी महाराष्ट्रभर जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी ची निवड केली गेली आहे. त्यात विदर्भ चंडिकाचे जिल्हा प्रतिनिधी मुन्ना उर्फ संतोष खेडकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

तसेच बल्लारपूर तालुका अध्यक्ष म्हणून अजय रासेकार, सचिव पारिष मेश्राम, कोष्याध्यक्ष देवेंद्र झाडे, प्रमुख सल्लागार प्रशांत विघ्नेश्वर, सल्लागार म्हणून अँड. संजय बोराडे तर राज्य कार्यकारिणी सदस्य पदी पद्माकर पांढरे गुरुजी यांची निवड केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos