महत्वाच्या बातम्या

 इंटरनेटचा वापर करतांना युवकांनी सुरक्षितता बाळगायला हवी : डॉ. प्रीती पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : इंटरनेटच्या माध्यमातून जग जसे आपल्या मुठीत आले आहे. तसा त्याचा धोकाही वाढला आहे. त्याचा वापर करताना सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली नाही तर आपल्याला आर्थिक आणि मानसिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना आपण सुरक्षितता बाळगायला हवी, असे प्रतिपादन समाजशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. प्रीती पाटील यांनी केले. 

निम्म्याहून अधिक काम आपण ऑनलाईन करत आहोत. तसेच आपली बहुतांश आर्थिक कामे ऑनलाईन होत आहेत. अशा परिस्थितीत ते सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्या म्हणाले. गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यापीठात सुरक्षित इंटरनेट दिवस कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद जावरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकानी  घेतला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos