बालकावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
मासे पकडण्याकरीता गेलेल्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे. अवकाश उर्फ भुऱ्या  प्रकाश चट्टे (२०)   रा. मदनी दिंदोंडा, हल्ली मूक्काम संत्रा मार्केट, नागपूर असे आरोपीचे नाव आहे. 
 ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास    पिडीत मुलगा व त्याचा मीत्र मासे पकडण्याकरीता खंडाते सभागृह जवळील रेल्वे पुलाचे खाली, म्हसाळा येथे गेले असता एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला . त्यांना दुसऱ्या  ठिकाणी चला, तेथे मासे पकडू. तसेच पीडीत मुलगा व त्याचा मीत्र त्याचे सोबत गेले असता रेल्वे पुलाखाली बोगद्यामध्ये जबरीने व जिवे मारण्याची धमकी देवून   त्याचेवर अनैसर्गीक कृत्य केले. अशा पिडीत मुलाच्या  प्रश्न उत्तरी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अप.क्र.  कलम ३७७, ५०६  भादवि सहकलम ४,६, १० लैंगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. 
यातील पीडीत मुलगा हा घटनेपासून १०  दिवस रूग्णालयात भरती होता. त्यावरून गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवून  पोलीस अधिक्षक सा. व मा. अपर पोलीस अधिक्षक  यांनी सदर गुन्हयाचा दाखल तारखेपासूनच पाठपूरावा केला व गुन्हयातील आरोपी शोधाकरीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा., वर्धा यांनी सदर गंभीर गुन्हयाचे तपासाकामी दोन अधिकारी व ४ पथकांची नेमूणक करून त्यांना जिल्हयाचे परीसरात तसेच आजूबाजूचे जिल्हयात तपासार्थ पाठवीले. 
याच दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाला सदर आरोपी हा मदनी (दींदोडा), वर्धा येथील असल्याचे प्राथमीक माहिती मिळाली वरून स्था.गु.शा.चे पाचही पथकांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथे लक्ष केंद्रीत केले व काल  १४ नोव्हेंबर  रोजी गुन्हयातील वर्णनाशी मिळणा-या इसमांस ताब्यात घेतले. व त्यांस विचारपूस केली असता त्याने आपले नांव अवकाश उर्फ भुऱ्या प्रकाश चट्टे याने गुन्हा केल्याची कबूली दिली.  सदर आरोपीस  अटक करण्यात आली आहे. 
 सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता व कोणताही पुरावा आरोपीने मागे सोडलेला नव्हता . पंरतू पोलीसांनी आपले कौशल्य पणाला लावून व वेशांतर करून सदर आरोपीस प्रयत्नांची पराकाष्ठा करून अटक केली.  सदर आरोपीचा सतत १०  दिवस वेगवेगळया परीसरात शोध घेतला व अटक करण्यात आली. 
 सदर कारवाई  पोलीस अधिक्षक डाॅ.  बसवराज तेली, व   प्रभारी पोलीस अधिक्षक  निखील पिंगळे, यांच्या  मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  निलेश ब्राम्हणे, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशांप्रमाणे पो.उप.नि. महेंद्र इंगळे, आशीष मोरखडे, पो.हवा. निरंजन वरभे, पो.शि. राकेश आष्टनकर, स.फौ. नामदेव किटे, स.फौ. साबळे, जांभुळकर पो.हवा. कुरेशी, डहाके, ठाकुर, भारद्वाज, जाधव, कांबळे, ना.पो.शि. श्रीवास, कट्टोजवार, शूक्ला, डफ, खैरकार, कांबळे, अवचट, शर्मा, बोगा, चालक ना.पो.शि. आत्माराम, मुकेश, विलास, भूषण सर्व नेमणूक स्था. गु. शा. वर्धा यांनी केली.

   Print


News - Wardha | Posted : 2018-11-16


Related Photos