महत्वाच्या बातम्या

 प्रयोगशील शेतकरी अशोक लिचडे यांनी ॲपल बोर, सिताफळ लागवडीतून लाखोंचे उत्पनन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जातो. साधारण 90 टक्के शेतकरी धानपिक घेतात. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांनी एकदा साकोली तालुक्यातील सानगडी येथील अशोक लिचडे, यांच्या फळबाग शेतीला भेट दिली पाहीजे.

शासकीय कंत्राटदार म्हणून आधी काम केलेल्या अशोक लिचडेंना शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याचे मनावर घेतले. आजुबाजूच्या फळबागायतदारांची फळशेती त्यांनी पाहिली होती. मात्र यामध्ये त्यांनी नविन प्रयोग करायचे ठरवले. साधारण तीन वर्षापूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला. तसेच त्यांनी 6 एकर शेतीमध्ये रेड काश्मिर ॲपल, बोर चे 1200 झाडे लावली आहेत. सोबतच 5 एकर शेतीमध्ये 2800 झाडे लावले. त्यासाठी त्यांनी कलम केलेली रोपे कलकत्त्यावरून आणली. काश्मिर ॲपल बोरचे उत्पादन जानेवारी, फेब्रुवारी मध्ये निघत तसेच स्थानिक बाजारपेठेत भंडारा-गोदिंया, नागपूर व वडसा पर्यंत त्यांना चांगली मागणी प्राप्त होते. काश्मिर ॲपल बोरच्या नुराणी, बालसुंदरी, मिस इंडीया या व्हरायटीही त्यांच्या शेतात आहेत. काश्मीरी ॲपल बोर चवीला सफरचंदासारखे असुन त्यामध्ये मगज जास्त प्रमाणावर असतो.

मोठया प्रमाणावर नफा देणारे उत्पन्न म्हणून फळबाग लागवडीकडे वळल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. साकेाली उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अधिकारी गिधमारे, कृषी सहायक गायकवाड यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. चिंचा, पेरू यांनीही लगडलेली झाडे लिचडे यांच्या शेतात आहेत. फळबागेला उपयुक्त सेंद्रीय खताची निर्मिती करण्यासाठी त्यांनी शेतात डिकंपोझर युनीट सुध्दा बसवले आहे. फळबाग शेतीद्वारे लाखांचे उत्पादन घेण्यासाठी खरोखर शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे असे लिचडे यांच्या फळबागेकडे पाहून वाटते.





  Print






News - Bhandara




Related Photos