महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण रूग्णालय कोरची येथे वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : राष्ट्रीय आरोग्य अभियान व ग्रामीण रुग्णालय कोरची यांच्या संयुक्त विघमाने आदिवासी भागातील रुग्णांना विशेष तज्ञांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2022 गुरूवार ला ग्रामीण रुग्णालयत निःशुल्क आरोग्य व दंत शिबीराचे कोरची येथील वैद्यकीय व दंत ग्रामीण रूग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   

शिबीरात दंतरोग चिकित्सा व उपचार, डोळ्याची तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तादाब, पक्षाघात व इतर आजाराचे निदान तसेच उपचार स्त्रीरोग तपासणी व उपचार आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला दिला आहे.

त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ अनिल रुडे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली उदघाटक म्हणून सोमनाथ माळी तहसीलदार कोरची हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मनोज अग्रवाल, विनोद मडावी तालुका आरोग्य अधिकारी कोरची, डॉ बागराज धुर्वे निवासी वैद्यकीय अधिकारी गडचिरोली , डॉ थूल वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कोरची, राजेश फाये संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती कोरची हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ धुर्वे यांनी केले व कोरची तालुक्यातील चालू असलेले विविध योजना बाबतीत संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये यांनी माहिती दिले. त्याचप्रमाणे या शिबिराचे सविस्तर मार्गदर्शन डॉ. रुडे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी सांगितले तसेच कार्यक्रमाचे संचालन रुपेश भैसारे समुपदेशक(NCD) यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद सातपुते (STS) यांनी मानले .

या शिबिरात कोरची, बेतकाठी, मोहगाव, कोचिनारा, गुटेकसा, साल्हे मसेली, कोटरा, बोटेकसा, कोटगुल, बेडगाव आदि गावातील महिला पुरुषांनी लाभ घेतला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos