महत्वाच्या बातम्या

 ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनी विविध योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा व्यवस्थापक‍


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना स्वंयरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अस्वार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनकरिता 1 लाखापर्यंत थेट कर्ज योजना, 5 लाखापर्यंत 20 टक्के बिजभांडवल योजना, 10 लाखापर्यंत वैय्यक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, 10 ते 50 लाखापर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजना, 10 ते 20 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते.

वरिल योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छु‍क उमेदवारांनी www.msobcfdc.org संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीकरिता जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक येथील कार्यालयास भेट द्यावी. 9665278074, 9158188739 व 9552315088  या भ्रमणध्वनीवर देखील संपर्क साधता येईल.  





  Print






News - Bhandara




Related Photos