महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील वीजबिल थकबाकी २४२ कोटी ९० लाखाच्या घरात


- चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व  पथदिव्यांची थकबाकी 

- वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम जोरात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात - चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२कोटी ९० लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारा विरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम जोरात राबविण्यात येत आहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी वसुली कामात गुंतले आहेत. ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.

ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही सर्वाना वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. चंद्रपूर परिमंडळात (चंद्रपूर  व गडचिरोली जिल्हा एक‍त्र‍ित ) चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १३ कोटी ६८ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी  १२ लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन ६ कोटी ६३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजनांकडून ३ कोटी ४३ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०८  कोटी ३१ लाख येणे आहेत. 

त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु आहे. महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण याआपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील ग्राहक निहाय चालू व मागील वर्षातील एकूण थकबाकी 

चंद्रपूर जिल्हयातील एकूण थकबाकी : १२८ कोटी ९६ लाख, ग्राहकांची वर्गवारी चंद्रपूर जिल्हा – घरगुती  -९ कोटी ४२ लाख, वाणिज्य -३ कोटी ६६ लाख , औद्योगिक-५ कोटी ३८ लाख, पथदिवे -१०५ कोटी ४३ लाख, पाणीपुरवठा योजना -३ कोटी १२ इतर व सरकारी कार्यालये -१कोटी ९४ लाख अशी एकूण- १२८ कोटी ९६.

गडचिरोली जिल्हयातील एकूण थकबाकी : ११३ कोटी ९४ लाख 

ग्राहकांची वर्गवारी गडचिरोली ‍जिल्हा - घरगुती - ४ कोटी २५ लाख, वाणिज्य ४६ लाख, औद्योगिक - १ कोटी ३६, पथदिवे-१०२ कोटी ४७, पाणीपुरवठा योजना -३० लाख, इतर व सरकारी कार्यालये -४ कोटी ६९ लाख अशी एकूण- ११३ कोटी ९४.





  Print






News - Chandrapur




Related Photos