सिंदेवाही येथे पद्मशाली समाजाचा मेळावा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही येथे पद्मशाली समाजाचा मेळावा नुकताच मार्कंडे सभागृहात पार पडला. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगर पद्मशाली समाजाचे अध्यक्ष उद्धव चिंदमवार, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव परसावार, नगरसेविका अपूर्वा चिंतलवार, संध्या बल्लेवार, उपस्थित होते. सर्वप्रथम महामुनी मार्कंडेयच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. त्यानंतर नगर पद्मशाली समाजाची सचिव उमेश बी टूरवार, यांनी प्रास्ताविक समाजकार्याची माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांनी समाजाच्या विकासाकरिता संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाज बांधव व भगीनींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुला मुलींना पुरस्कार वितरित करण्यात आले, मिळाव्यामध्ये नगर पद्मशाली समाजाच्या अध्यक्षपदी राजेश बोम्मावार, उपाध्यक्ष रवी कुचनवार, महिला अध्यक्षपदी संध्याताई बल्लेवार यांची अविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सचिव उमेश बिट्टूवार यांनी मांडले. मिळाव्याला बहुसंख्य पद्मशाली समाजातील बांधव उपस्थित होते.
News - Chandrapur