सुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली


- विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांनी आज १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा उत्पात माजविला असून एका रस्ता कामावरील वाहने जाळली. तसेच कंत्राटदाराची हत्या केली आहे.  हरीशंकर साहु असे हत्या करण्यात आलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे.
मिसमा - चिचोडगुडा मार्गाचे काम सुरू आहे. दरत्यान मिसमापासून ६ किमी अंतरावरील उपमपल्ली गावाजवळ नक्षल्यांनी सहा गाड्यांना आग लावून दिली. या ठिकाणी काम करीत असलेले कंत्राटदार हरीशंकर साहु यांना काही अंतरावर नेवून ठार करण्यात आले. कंत्राटदार साहु भिलाई येथील रहिवासी होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. घटनेनंतर सिरआरपीएफ आणि दोरनापाल पोलिस घटनास्थळी पोहचले होते. या परिसरात नक्षल शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

   Print


News - World | Posted : 2018-11-15


Related Photos