महत्वाच्या बातम्या

 आंतरक्रिया उपक्रम राबवुन शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत : केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांचे प्रतिपादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : शिक्षकपर्व अंतर्गत नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिग्दर्शन सत्र व आंतरक्रिया उपक्रम राबवुन शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी गांधीनगर येथे आयोजित शैक्षणिक सत्र २०२२-२३ च्या आमगाव केंद्र अंतर्गत चौथ्या शिक्षण परिषदेला मार्गदर्शन करतांना केले.जि.प.व. प्राथमिक शाळा गांधीनगर येथे ११ ऑक्टोबर रोजी शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समुहसाधन केंद्र आमगावचे केंद्रप्रमुख आनंद गुरनुले तर अध्यक्षस्थानी जि.प.व. प्राथमिक शाळा सावंगी येथिल पदवीधर शिक्षकदिनदयाल प्रधान होते. शिक्षण परिषदे दरम्यान देसाईगंज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पुरुषोत्तम चापले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक गजानन शेंद्रे, ज्ञानेश्वर लाडे, दिलीप मेंढे, जयशिव सुंदरकर, विष्णू दुनेदार,निलेश तित्तीरमारे, मुख्याध्यापक गभणे, समूह साधन केंद्रातील साधन व्यक्ति जितेंद्र पटले, राणू ठाकुर,वैशाली खोब्रागडे विषयतज्ज्ञ व शिक्षक आदी उपस्थित होते शिक्षण परिषदे दरम्यान विविध तासिका घेण्यात आल्या यामध्ये शिक्षकपर्व अंतर्गत नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिग्दर्शन सत्र अंतर्गत ऊर्मिला कापगते यांनी पायाभूत स्तर वर्ग १ ते २ पंकज नाकाडे यांनी पूर्व तयारी स्तर - वर्ग ३ ते ५, मधुकर मिसार यांनी मध्य स्तर - वर्ग ६ ते ८, दुर्गाप्रसाद चुलपार यांनी माध्यमिक स्तर- वर्ग ९ ते १२, फुलोरा विषयी जैमिनी लाडे, देवचंद म्हस्के यांनी राणू ठाकूर साधनव्यक्ती यांनी निपूण भारत अंतर्गत माता पालक गट सहभाग, वैशाली खोब्रागडे यांनी दिव्यांग बालकांविषयी योजना, बालकांचे हक्क व संरक्षण याविषयी साधनव्यक्ती जितेंद्र पटले यांनी तर केंद्रप्रमुख आनंद गुरनुले यांनी प्रशासकीय बाबी या विषयावरील तासिका घेतली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos