गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
दि गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को. आफ बँक लिमिटेड गडचिरोली च्या वतीने  जिल्हा गौरव पुरस्कार वितरण तथा झाडीपट्टी रंगभूमीचे  ' प्रकाशरंग ' पुस्तकाचे  विमोचन थाटात करण्यात आले. 
 कार्यक्रमाप्रसंगी  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री  ना. गिरीश  बापट, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री   ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीताताई भांडेकर, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजबे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार , जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रांचित सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार प्राप्त  राकेश नाकाडे, देसाईगंज नप चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा तथा विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी  राकेश  नाकाडे यांना जिल्हा गौरव पुरस्कार देऊन  ना. गिरीश  बापट यांच्या हस्ते  मान्यवरांचा उपस्थितीत गौरविण्यात आले. तसेच यावेळी झाडीपट्टी रंगभूमीचे  ' प्रकाशरंग ' पुस्तकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला साहित्यिक, लेखक, नागरिक, पत्रकार व बँकेचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-15


Related Photos