महत्वाच्या बातम्या

 महिला खेळाडूंशी गैरवर्तन करणाऱ्या गोंडवाना विद्यापीठातील प्रशिक्षक व व्यवस्थापकाला निलंबित करा


- भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची कुलगुरूंकडे मागणी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
गोंडवाना विद्यापीठा तर्फे चेन्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनी सोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद  अवस्थेत गैरवर्तन व छेडखानी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे ही बाब अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली महिला आघाडीच्या वतीने जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखन यांना आज 7 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दिनांक 27 ते 30 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठाकडून 25 जानेवारी रोजी चेन्नई येथे दहा विद्यार्थिनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्या सोबत प्रशिक्षक राकेश हजारे व व्यवस्थापक विजय सोनकुवर हे गेले होते. मात्र या दोघांनी चेन्नई येथे गेल्याच्या पहिल्याच दिवशी पासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन व छेडखानी करणे सुरू केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी अमरावती व मुंबई विद्यापीठातील खेळाडू मुलीसोबत देखील मोबाईल चार्जर मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले व मुलींची छेड काढली ही बाब अत्यंत गंभीर असून धक्कादायक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने कुलसचिव यांच्या मार्फत कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. वास्तविक पाहता कोणत्याही विद्यापीठातील महिला खेळाडूंना स्पर्धेकरिता पाठविताना महिला प्रशिक्षक किंवा महिला सहकारी देणे आवश्यक असताना विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. 

सोबतच व्यवस्थापक विजय सोनकुवर यांच्यावर खेळाडूंच्या चमू सोबत जाण्यास दोन वर्षापासून बंदी असतानाही त्यांना मुलींच्या चमुसोबत पाठविण्यात आले एवढेच नव्हे तर तक्रार करण्यासाठी विद्यापीठात गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनी सोबत व्यवस्थापक विजय सोनकुवर यांनी पुन्हा गैरवर्तणूक करीत त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार अत्यंत संतापजनक असून गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती मार्फत सखोल व योग्य चौकशी करून दोषी प्रशिक्षक राकेश हजारे व व्यवस्थापक विजय सोनकुवर यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी व यापुढे असा प्रकार होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनी केली आहे.

 गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखण यांना निवेदन देताना भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे शहर महामंत्री केशव निंबोड शहर उपाध्यक्ष विवेक बैस महिला आघाडी विमुक्त भटक्या जमातीच्या उपाध्यक्ष अलका पोहनकर, ओबीसी मोर्चाच्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, नीता विवेक बैस, सोशल मीडिया प्रमुख यिशा फुलबांधे, रूपाली सातपुते महिला आघाडी विमुक्त भटक्या जमातीच्या शहराध्यक्ष पुनम हेमके व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुलसचिव अनिल हिरेखण यांनी या प्रकरणाबाबत चौकशी सुरू असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कडक कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्याचे आश्वासन महिला आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos