बल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  करून चार आरोपींना अटक केली आहे .  
 १४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान गस्त करतांना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि कळमना शेत शिवारात मोठ्या प्रमाणात दारू साठा लपवून ठेवला आहे आणि तेथून जवळचा गावाला व शहराला अवैध दारू पुरवठा केला जात आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीती ने लपवून ठेवलेला दारू साठा जप्त करण्यात आला. त्यात १४ देशी दारू पेट्या, १ मोपेड गाडी व मोबाईल असा अंदाजे २ लाख २२ हजार रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे . तसेच  जावेद हुसेन साबीर हुसेन रा. फुलसिंग नाईक वॉर्ड बल्लारपूर व इतर ३ आरोपी रा. बल्लारपूर यांच्यावर कलम ६५ (ई) ८३ मुदाका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धोबे, कुमोद खनके, अजय कटाइत, प्रशांत निमगडे, मनोज पिदूरकर यांनी केली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-15


Related Photos