बल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले


- जुनोना जंगल परिसरातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघीणीला ठार मारण्यात आल्याचे प्रकरण गाजत असतानाच आणखी दोन वाघांच्या बछड्यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. ही घटना आज १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३०  वाजताच्या सुमारास घडली.
लोहारा नजीकच्या जुनोना बीट एफडीसीएमच्या जंगलात गोंदिया - बल्लारपूर दरम्यान जाणाऱ्या पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले. या बछड्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील पाच ते सहा महिन्यांपासून या परिसरात हे दोन वाघांचे बछडे वावर करीत होते. दोन्ही बछडे रेल्वेसमोर आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-15


Related Photos