महत्वाच्या बातम्या

 आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून ३० लाख मंजूर निधीतून सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील गणेश नगर सहयोग कॉलनीचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून ३० लाख मंजूर निधीतून डॉ.कोलते ते बशीर अहमद यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन व काम सुरू करण्यात आले. गोंदिया शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन झाल्यानंतर रस्ते बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक स्वनिधीतून गोंदिया शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.त्यासोबतच गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार विनोद अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत.

आमदार विनोद अग्रवाल हे नेहमीच सार्वजनिक समस्यांकडे आकर्षित झाले असून, सार्वजनिक समस्यांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचे काम करतात. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. कोरोना महामारीनंतरही आमदार विनोद अग्रवाल यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करत जनहितासाठी काम केले, त्यासोबतच गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. त्याच बरोबर आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सरकारची मदत आणि जनहिताच्या कामात ते नेहमीच पुढे असतात.

या भूमिपूजन प्रसंगी प्रमुख युवा नेते रोहित अग्रवाल, आशिष ठाकरे, डॉ. कोलते मेडम, डॉ. माधुरी नसरे, सौ. मंजू कात्रे, सौ. मूलचंदानी, सौ. संतवाणी, हर्षपाल रंगारी, डॉ. कोलते, अजय हिसारिया, आकाश कात्रे, अंकुश लालवाणी, शुभम अग्रवाल, गिरीश बिल्डानी,  गोलू रमाणी, राहुल गंबानी, शुभम अग्रवाल, आर एस ठक्कर, कौशिफ अहमद, भरत जेठानी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos