नागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
खुल्या जागेमध्ये बसणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी १ हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणारे नागपूर महानगर पालिकेतील दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
 विलास श्रीरामजी चरड (४८) ऐवजदार, आरोग्य विभाग महानगर पालिका नागपूर व  सुरेश कृष्णराव डांगे   (५३) ऐवजदार वाहनचालक, यांत्रिकी विभाग/कारखाना विभाग, महानगर पालिका नागपूर अशी लाचखोरांची नावे आहेत.   तक्रारदार  टिमकी, दादरा पुलाजवळ, नागपूर येथील रहीवासी असुन महानगर पालिका नागपूर येथे शासकीय नोकरी करतात. प्रभाग क्रमांक ८ मधील टिमकी, दादरा पुलाजवळील खुल्या जागेमध्ये बसलेल्या कुत्र्याना पकडण्या करिता तक्रारदारांनी १३ नोव्हेंबर रोजी गांधीबाग झोन क्रमांक ६, कार्यालय नागपूर येथे रीतसर अर्ज केला होता. सदर दिलेल्या तक्रार अर्जाबाबत चौकशी करण्याकरिता   विलास श्रीरामजी चरडे व   सुरेश कृष्णराव डांगे महानगर पालिका नागपूर यांना भेटले असता त्यांनी  कुत्र्याना पकडण्याकरिता तक्रारदारास  अडीच हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास विलास श्रीरामजी चरडे व सुरेश कृष्णराव डांगे यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर तर्फे आज १४ नोव्हेंबर रोजी सापळा कार्यवाही आयोजीत केली असता सापळा कार्यवाही दरम्यान   विलास   चरडे, व सुरेश डांगे यांनी  तडजोडीअंती १ हजार १ हजार ५०० रूपये लाचरक्कम स्विकारली. यावरून दोन्ही आरोपी विरूध्द   तहसिल नागपूर शहर पोलिस ठाण्यात कलम ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंध कायदा (सुधारीत) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर चे पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक  पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक  राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात  पोलिस निरीक्षक,   शुभांगी देशमुख, पोलिस हवालदार वकिल शेख, नापोशि  रविकांत डहाट, महिला पोलिस शिपाई दिप्ती, रेखा यादव  यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2018-11-14


Related Photos