महत्वाच्या बातम्या

 जात निहाय जनगणना करण्यात यावी : सावली तालुक्यातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सावली : नुकतेच बिहार राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना सुरू झालेली आहे. राजस्थान, कर्नाटक या राज्याने जातनिहाय जनगणना केलेली आहे. तसेच छत्तीसगड, ओडिसा, तामिळनाडू या राज्यामध्ये सुद्धा जात निहाय जनगणना होणार आहे. याचा उपयोग त्या - त्या राज्याच्या विकासासाठी होणार आहे. महाराष्ट्रातसुद्धा जात निहाय जनगणना करण्याबाबतची ३३ वर्षापासून ची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाची संबंधित आहे मात्र, जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. तसा ठराव ९ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन सभापती नानाभाऊ पटोले यांनी सभागृहात मांडला होता आणि तो ठराव सर्व राजकीय पक्षांनी एकमताने मंजूर केलेला आहे. 

देशातील जातनिहाय जनगणना करून ९० वर्षे पूर्ण झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांची जात निहाय तर इतर सर्वांची एकत्रित करण्याचे धोरण स्वीकारले. यामुळे मागासवर्गीय असलेले ओबीसी वंचितच राहिले आहेत सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग या आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे. ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले आहे. ५ मे २०१० ला संसदेत तत्कालीन सदस्य समीर भुजबळ, स्व. गोपीनाथराव मुंडे, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, शरद यादव यांचे सह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला होता. त्यातून २०११ ते २०१४ मध्ये केंद्र सरकारने सामाजिक व आर्थिक जात गणना केली. मात्र त्याची आकडेवारी जाहीर केलेली नाही. सन २०१७ साली देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ मध्ये राष्ट्रीय जनगणना जातनिहाय करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते. मात्र आपल्या देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगणनेचे काम अजून पर्यंत व्हायचे आहे. 

यामुळे बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा जनगणने सोबतच जातनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी सावली तालुक्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावली तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलेले आहे. हे निवेदन देताना समता परिषद चे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ते अनिल गुरनुले, नगरपंचायत सावलीचे सभापती नितेश रस्से, पत्रकार आशिष दुधे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रोशन बोरकर, तालुकाध्यक्ष भास्कर आभारे, नगरपंचायत सावलीचे माजी उपाध्यक्ष भोगेश्वर मोहूर्ले, काँग्रेस कार्यकर्ते मनोज चौधरी, कडोलीचे सरपंच किशोर कारडे, उपसरपंच प्रमोद दाजगाये, बंडू चिप्पावार, शाळा व्यवस्थापन सोनापूरचे अध्यक्ष श्रीधर सोनुले, अतुल कोपुलवार, प्रवीण देशमुख, रवींद्र निकेसर, मारोती गावतुरे आदी मान्यवर उपस्थित होते .





  Print






News - Chandrapur




Related Photos