शेतकरी महीलेने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन केली आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / हिंगणघाट : 
अल्लीपुर येथील विठ्ठल मंदीर वार्ड मधील  रहिवासी शेतकरी महीला शकुंतला ईश्वर महाकाळकर (६२)  हिने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ज्या वेळेस आत्महत्या केली तेव्हा मुलगा व सुन भाऊबीजेसाठी देवळी या गावी गेले होते.  महीलेच्या नावाने दोन एकर शेत असुन त्या शेतावर स्टेट बॅंक शाखा अल्लीपुर चे ४५ हजार रुपयांचे  कर्ज आहे. तिची प्रकृती दोन महिन्यांपासून बरोबर नव्हती. घरची परिस्थिती अत्यंत नाजुक होती . त्यामुळे कंटाळुन तिने  आत्महत्या केली . अल्लीपुर पोलीस स्टेशनचे एएसआए चहांदे यांनी  घटनास्थळी जाऊन पंचनामा करून वर्धा येथील सामान्य रुग्णालयात  मृतदेह शवच्छेदनासाठी पाठविला.   पुढील तपास सुरु आहे.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-14


Related Photos