मेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तेलंगणा सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मेडीगट्टा प्रकल्पात पोचमपल्ली सह अनेक गावातील शेतकरी बाधित होत आहेत. यामुळे बाधित गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करून त्यासबंधिचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोचमपल्ली गावाजवळ मेडीगट्टा सिंचन प्रकल्प होत आहे. या प्रकल्पासाठी पोचमपल्ली गावासह अनेक गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन प्रकल्पात गेली आहे. यामुळे उपजिवीकेसाठी त्यांच्याकडे कोणतेही साधन नाही. यामुळे बाधित गावांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे, या गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात यावे त्याबाबतचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. बांधित शेतकऱ्यांचे कुटूंब योग्य जीवन जगू शकतील यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंग  यांची आज कार्यालयात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना   सिरोंचा पं. स. चे माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, आविस सल्लागार रवी सल्लम, साई मंदा सह कार्यकर्ते उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-14


Related Photos